September 15, 2024 1:39 PM September 15, 2024 1:39 PM

views 13

बेल्जियमध्ये ब्रुसेल इथं झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत नीरज चौप्राला रौप्य पदक

बेल्जियमध्ये ब्रुसेल इथं झालेल्या डायमंड लीगचं सलग दुसऱ्यांदा रौप्य पदक नीरज चोप्रानं पटकावलं. नीरजनं ८७ पूर्णांक ८६ मीटर अंतरावर भाला फेकला, त्याचं सुवर्णपदक केवळ एका सेंटीमीटरनं हुकलं. या स्पर्धेत अँडरसन पीटर्स सुवर्ण तर जर्मनीच्या ज्युलियन वेबर यानं कांस्य पदक पटकावलं.

September 13, 2024 10:18 AM September 13, 2024 10:18 AM

views 17

नीरज चोप्रा आणि अविनाश साबळे डायमंड लीग फायनलमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व

ब्रुसेल्स इथं आजपासून सुरू होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधित्व पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे करणार आहेत. यंदा डायमंड लीगमधील अलियान्झ मेमोरियल व्हॅन डॅमे स्पर्धेत हे क्रिडापटू विजयासाठी लढत देतील. सध्या 14व्या क्रमांकावर असलेला भारताचा स्टीपलचेसर अविनाश साबळे आज डायमंड लीगच्या अंतिम फेरीत पदार्पण करेल. त्याचा सामना इथिओपियाचे सॅम्युअल फायरवू, गेटनेट वले, केनियाचे आमोस सेरेम आणि अब्राहम किबिवोट यांच्याशी होईल, तर स...