October 20, 2024 8:03 AM October 20, 2024 8:03 AM

views 9

सरकार अपयशी ठरल्यानं महिलांना पैसे वाटप करण्याची वेळ – अखिलेश यादव

राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्यानं महिलांना पैसे वाटप करण्याची वेळ या सरकारवर आल्याची टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. धुळे शहर मतदारसंघातून इर्शाद जहागीरदार यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर आयोजित सभेत ते आज बोलत होते. महायुतीचं सरकार हे धर्मा धर्मात तेढ निर्माण करणारं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करणारं सरकार आहे, असा आरोपही यादव यांनी केला. महायुतीचं सरकार हटवून महाविकास आघाडीचं सरकार बनवण्याचं आवाहन यावेळी अखिलेश यादव यांनी केलं.  &...

October 7, 2024 3:30 PM October 7, 2024 3:30 PM

views 6

धुळे जिल्ह्यातल्या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू

धुळे जिल्ह्यातल्या बोरविहीर ते नरडाणा या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालं आहे. तसंच नव्या धुळे रेल्वेस्थानकाच्या कामालाही सुरुवात झाली आहे, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांनी दिली. धुळे ते नरडाणा दरम्यान सहा रेल्वेस्थानकं असतील. यात बोरविहीर, न्यू धुळे, निमखेडी, कापडणे, सोनगीर, नरडाणा या स्थानकांचा समावेश आहे. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी टप्प्याटप्प्याने भूसंपादन करण्यात येणार आहे. २०२९ पर्यंत या रेल्वेमार्गाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे.

September 25, 2024 3:17 PM September 25, 2024 3:17 PM

views 12

धुळ्यात मराठा आंदोलकांचं मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मराठा आरक्षण आंदोलकांनी आज धुळे शहराजवळ मुंबई - आग्रा महामार्गावर रास्तारोको केलं. आंदोलकांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी केली. रास्तारोकोमुळे काही काळ महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.

September 17, 2024 7:03 PM September 17, 2024 7:03 PM

views 6

धुळ्यात विसर्जन मिरवणुकीत तिघांचा मृत्यू, ६ जण जखमी

धुळे जिल्ह्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली चिडल्यानं तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यांना भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धुळ्यातल्या चितोड गावात ट्रॅक्टरवरून विसर्जन मिरवणूक सुरू असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

September 14, 2024 7:13 PM September 14, 2024 7:13 PM

views 5

धुळ्यात लाडकी बहिण योजना कुटुंब भेट अभियानाला सुरूवात

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अधिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना कुटुंब भेट अभियानाची सुरुवात केली आहे.  या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुंटुंबाना भेट देऊन महिलांच्या अडचणी आणि समस्या सोडवणं हा या अभियानाचा उद्देश आहे.  या अभियानाला धुळे शहर आणि जिल्ह्यात देखील सुरुवात झाली आहे.  लेक लाडकी योजना,अन्नपूर्ण योजना, शिक्षण घेत असलेल्या मुलीनां मोफत उच्च शिक्षण योजना, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, कामगार योजना अशा शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आणि कुटुंबातल्या पात...

September 11, 2024 9:31 AM September 11, 2024 9:31 AM

views 12

धुळे जिल्हा लवकरच औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जाईल-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या औद्योगिक भागात आता लवकरच धुळ्याचे नाव असेल,असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल धुळ्यात व्यक्त केला. धुळे जिल्ह्यातल्या जामफळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातल्या 54 गावांना शेतीसाठी थेट वाहिनीद्वारे पाणी पुरवठा करणार्‍या 'बंदिस्त नळ वितरण प्रणाली' या योजनेचा शुभारंभ काल फडवणीस यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सहा राष्ट्रीय महामार्ग, मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग आणि सुलवाडे-जामफळ-कनोली जल प्रकल्पामुळे सिंचनाची सोय या सर्व सुविधा इथे उपलब्ध होत असल्याचा आनंद फडणव...

September 10, 2024 6:32 PM September 10, 2024 6:32 PM

views 13

धुळ्यात ‘बंदिस्त नलिका वितरण प्रणाली’ योजनेचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमीपजून

धुळे जिल्ह्यात निर्माण होत असलेल्या जामफळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातल्या ५४ गावांना शेतीसाठी थेट पाणीपुरवठा करणार्‍या 'बंदिस्त नलिका वितरण प्रणाली’ योजनेचं भूमीपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. सहा राष्ट्रीय महामार्ग आणि मनमाड-इंदूर रेल्वे मार्गामुळे प्रवास आणि वाहतुकीची सोय, तसंच सुलवाडे-जामफळ-कनोली जल प्रकल्पामुळे सिंचनाची सोय उपलब्ध होत असल्यानं राज्यातल्या औद्योगिक केंद्रांमधे भविष्यात धुळ्याचाही समावेश होईल, असा विश्वास फडनवीस यांनी यावेळी व्यक्त केला. 

August 23, 2024 7:18 PM August 23, 2024 7:18 PM

views 24

धुळे जिल्ह्याला आज रेड अलर्ट

धुळे जिल्ह्यात आज दुपारपासून जोरदार पाऊस झाला. पावसामुळे धुळे आणि साक्री तालुक्यातल्या जल प्रकल्पांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे.  मालनगांव, पांझरा, जामखेली प्रकल्प भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. अक्कलपाडा धरणातून आज दुपारी २४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पांझरा नदीला पुन्हा एकदा पूर आला असून नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  जालना जिल्ह्यातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. भोकरदन तालुक्यात काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पद्मावती धरणाच्...

August 9, 2024 10:38 AM August 9, 2024 10:38 AM

views 6

धुळे जिल्ह्यात तोरणमाळ इथं सेल्फी काढतांना पर्यटकाचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातील तोरणमाळ इथं पर्यटनासाठी आलेल्या एका युवकाचा सेल्फी काढतांना मृत्यू झाला. निसरड्या कड्यावरून पाय घसरून हा युवक दीड हजार फूट खोल दरीत पडला; 4 ऑगस्ट रोजी ही घटना घडली; यानंतर तीन चार दिवसांनी त्याचा मृतदेह सीताखाई मधून बाहेर काढण्यात आला आहे.

July 18, 2024 7:33 PM July 18, 2024 7:33 PM

views 18

धुळ्यात सोनगीर ग्रामपंचायतीत शौचालय अनुदान घोटाळा उघडकीस

धुळे जिल्ह्यात सोनगीर ग्रामपंचायतीत शौचालय अनुदान घोटाळा झाल्याचं उघडकीला आलं असून, या प्रकरणी महिला सरपंच, ग्रामविस्तार अधिकारी आणि तीन लाभार्थीं विरोधात २१ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.   सोनगीर ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी १५ एप्रिल २०२० ते ३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत, १७५ लाभार्थ्यांसाठी मंजूर झालेली शौचालयाच्या अनुदानाची रक्कम नियम बाह्य पद्धतीनं केवळ तीन लाभार्थ्यांच्या नावावर काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात नोटीस बजावण्या...