October 18, 2025 2:48 PM
39
धुळे पोलिसांची दिवाळी सणानिमित्त विशेष मोहिम
धुळे शहरात दिवाळी सणामुळे वाढलेली गर्दी, वाहतुकीची कोंडी तसंच विविध गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी धुळे पोलीस दलानं विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गस्त वाढवली आहे. शहरात शांतता आणि आनंदी वातावरण राखण्यासाठी नागरिकांनी जबाबदार वर्तन करावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.