August 11, 2025 1:29 PM August 11, 2025 1:29 PM

views 9

काँग्रेस शत्रुराष्ट्रांची भाषा बोलत असल्याचा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आरोप

काँग्रेस शत्रुराष्ट्रांची भाषा बोलत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. नवी दिल्ली इथं ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. हातून सत्ता गेल्यामुळे अराजक माजवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. घुसखोरांना मतदार घोषित करुन काँग्रेसला सत्ता मिळवायची आहे, असं ते म्हणाले.

July 19, 2025 3:11 PM July 19, 2025 3:11 PM

views 11

२०४७ सालापर्यंत विकसित देश बनण्याचं भारताचं ध्येय- केंद्रीय शिक्षण मंत्री

२०४७ सालापर्यंत विकसित देश बनण्याचं भारताचं ध्येय असून, ते साध्य करण्यामध्ये  प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते केरळमध्ये आयआयटी पलक्कड च्या ७ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते.   विद्यार्थ्यांनी वाहतूक, गृहनिर्माण, वैद्यकीय सुविधा आणि शेतीसह विविध क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जागतिक डिजिटल विश्वात भारताचं वाढतं अस्तित्व लक्षात घेता, देशभरात सम...

April 2, 2025 3:41 PM April 2, 2025 3:41 PM

views 18

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे देशाचं बौद्धिक पुनर्जागरण- प्रधानमंत्री

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे देशाचं बौद्धिक पुनर्जागरण आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका दैनिकात लिहिलेला लेख प्रधानमंत्र्यांनी सामायिक  करताना हे वक्तव्य केलं.   नवं शैक्षणिक धोरण शिक्षण आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर प्रतिस्पर्धा करु शकणारं राष्ट्र घडवण्याचा मार्ग प्रशस्त बनवत आहे, असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.

January 4, 2025 8:50 PM January 4, 2025 8:50 PM

views 8

शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या प्रगतीसाठी निधी वाढवण्याचा सरकारचा विचार – धर्मेंद्र प्रधान

शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या प्रगतीसाठी निधी वाढवण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान  यांनी आज दिली. दिल्ली विश्वविद्यालयात सर्मपण सोहळ्याचं उद्घाटन प्रधान यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.    सशक्त बेटी आणि ई-दृष्टी योजनांचं उद्घाटन प्रधान यांनी या कार्यक्रमात केलं. या योजनांर्तंगत अनाथ तसंच एकल माता असलेल्या दृष्टीबाधित विद्यार्थींनीना लॅपटॉप आणि टॅबलेटचं वाटप प्रधान यांनी केलं. दिल्ली विश्वविद्यालयात रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध केली असून ...

July 24, 2024 10:07 AM July 24, 2024 10:07 AM

views 9

नीट परीक्षेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून स्वागत

नीट परीक्षेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वागत केलं असून, शेवटी सत्याचा विजय झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेला त्रुटीमुक्त संस्था बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, नीट घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना सोडलं जाणार नाही, असंही प्रधान यांनी स्पष्ट केलं. एनटीएच्या संपूर्ण सुधारणेसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, समितीनं तज्ज्ञांची मतं जाणून घेतली आहेत आणि विविध पद्धतींचा अभ्यास केला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते ...

July 22, 2024 1:30 PM July 22, 2024 1:30 PM

views 7

नीट युजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार केवळ पाटणा इथं झाल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन

नीट युजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार केवळ पाटणा इथं झाल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत सांगितलं. नीट परीक्षेतल्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत चालू असून याप्रकरणी न्यायलयात सुनावणी सुरु आहे. असं ते म्हणाले. देशभरात ४हजार ७०० केंद्रांवर नीट युजी परीक्षा घेण्यात आली. त्यातल्या एका केंद्रावरच अनियमतता झाल्याची नोंद आहे, असं एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं. लोकसभेतले विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी देशात स्पर्धापरीक्षा यंत्रणेबद्दलचा म...

June 21, 2024 10:05 AM June 21, 2024 10:05 AM

views 16

नीट परिक्षेसंबंधीत चौकशी करण्याची उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याची घोषणा

वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-नीट २०२४ संबंधीत मुद्यांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय परीक्षा परिषद आणि तिच्या कार्यप्रणालीत आणखी सुधारणा करण्यासाठी या समितीकडून शिफारसी अपेक्षित असल्याचं प्रधान यांनी सांगितलं.