November 24, 2025 3:29 PM November 24, 2025 3:29 PM
80
सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन
सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचं आज निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना प्रकृतीअस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह निकटवर्तीय उपस्थित होते. ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ३०० हून जास्त चित्रपटांमधे भूमिका करणारे धर्मेंद्र यांनी १९६० मधे दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून...