March 29, 2025 7:51 PM March 29, 2025 7:51 PM

views 11

तुळजापूर मंदिर विकास आराखड्याला शासनाची तत्वतः मान्यता

तुळजापूर मंदिर विकास आराखड्याला शासनाने तत्वतः मान्यता दिली असून महत्वाच्या कामांसाठी तातडीनं निधी वितरित केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज तुळजापूर विकास आराखड्याचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या आराखड्याची दोन वर्षांत अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

November 6, 2024 10:23 AM November 6, 2024 10:23 AM

views 12

धाराशिव-तुळजापूर रेल्वेमार्गाचं सात किलोमीटरचं पायाभूत काम पूर्ण

धाराशिव-तुळजापूर रेल्वेमार्गाचं सात किलोमीटरचं पायाभूत काम पूर्ण झालं आहे. कामाचा वेग असाच कायम राहिल्यास, आपण ठरवलेल्या उद्दिष्टानुसार पुढील २४ महिन्यांच्या आत कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्रापर्यंत रेल्वेमार्गाचं काम नक्की पूर्ण होईल, असा विश्वास, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.