October 5, 2025 3:10 PM October 5, 2025 3:10 PM
24
धाराशिवमध्ये पुन्हा जोरदार पाऊस
धाराशिव जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं जिल्ह्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली असून काल रात्री अकरा वाजल्यापासून रात्रभर भूम, वाशी आणि कळंब तालुका परिसरात जोरदार पाऊस बरसला. नद्यांचं पाणी वाढल्यानं अनेक गावांकडे जाणारे रस्ते बंद आहेत. सध्या पावसाचा जोर ओसरला असून वातावरण ढगाळ आहे. मांजरा धरणाचा पंधरा हजार क्युसेक वेगाने विसर्ग देखील सुरू करण्यात आला आहे.