October 29, 2024 1:04 PM October 29, 2024 1:04 PM
11
धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात घट
देशांतर्गत सराफा बाजारात आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत प्रतितोळा ५०० रुपयांची घट झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत आज ८० हजारांवरून घसरून ७९ हजार ७९० रुपये झाली आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७३ हजार १४० रुपये झाला आहे. चांदीच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नसून चांदीचा दर ९७ हजार ९०० रुपये प्रतिकिलो इतका आहे.