September 22, 2024 6:26 PM September 22, 2024 6:26 PM

views 8

लातूरमध्ये धनगर समाजाचं सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन

धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करायच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आज धनगर समाजानं लातूर जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन केलं. अहमदपूरचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीर इथं क्रीडामंत्री संजय बनसोडे, निलंगा इथले भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरापुढे आंदोलकांनी हलगी वाजवून त्यांचं लक्ष वेधलं, तसंच घोषणाबाजी केली. तसंच 'धनगड' अशा नामोल्लेखाला आपलं समर्थन असल्याचं पत्रही या आमदारांकडून आंदोलकांनी घेतलं.

June 16, 2024 8:05 PM June 16, 2024 8:05 PM

views 20

पंढरपूर येथे धनगर समाजाची विविध मागण्यासाठी बैठक

पंढरपूर इथं आज सोलापूर जिल्ह्यातल्या धनगर समाजाची बैठक झाली. धनगर समाजातल्या तरुणांना तीस लाख बिनव्याजी कर्ज मिळावं, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भवनासाठी पंढरपुरात जागा उपलब्ध करून द्यावी, अहिल्यादेवी आर्थिक विकास महामंडळाला येत्या अधिवेशनात निधी वर्ग करावा, आदी मागण्या राज्य सरकारकडे करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा या बैठकीतून सरकारला देण्यात आला.