July 16, 2025 6:51 PM July 16, 2025 6:51 PM
5
प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. पुढची ६ वर्षं देशातल्या १०० आकांक्षित जिल्ह्यांमधे ही योजना राबवली जाईल. कृषी उत्पादकता वाढवणं, पीक बदल आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार तसंच पंचायत आणि विकासखंड स्तरावर सिंचन सुविधांमधे वाढ, अल्प आणि दीर्घकालीन पतपुरवठा इत्यादी उद्दिष्टं या योजनेत निर्धारित केली आहेत. सध्या राबवण्यात येणाऱ्या...