October 1, 2025 3:11 PM October 1, 2025 3:11 PM

views 243

नागपूरच्या दीक्षाभूमीत एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उद्या मुख्य सोहळा होणार

नागपूरच्या दीक्षाभूमीत एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उद्या मुख्य सोहळा होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते आज दीक्षाभूमी परिसरातील मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. काल ३० सप्टेंबर पासूनच दिक्षाभूमीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अनुयायांच्या सोयीकरिता नागपूर महानगरपालिका...

September 29, 2025 3:20 PM September 29, 2025 3:20 PM

views 27

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर – नांदेड दोन विशेष रेल्वेगाड्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर - नांदेड दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. पहिली विशेष गाडी नांदेड इथून एक ऑक्टोबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता सुटेल, तर नागपूर इथं दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन तारखेला १२ वाजून दहा मिनिटाला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी तीन ऑक्टोबर रोजी रात्री एक वाजता नागपूर इथून सुटेल आणि नांदेडला सकाळी ११ वाजता पोहोचेल.