March 21, 2025 8:11 PM March 21, 2025 8:11 PM
4
देवगड हापुस आंब्यावर लागणार आयडी कोड !
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड हापुस आंब्याच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी या वर्षीपासून या आंब्यावर यूनिक आयडी कोड लावण्यात येणार आहे. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने हा निर्णय घेतला आहे. या नवीन पद्धतीनुसार, अस्सल हापुस आंब्यावर हा स्टिकर लावणं बंधनकारक होणार आहे. या स्टिकरवरचा क्यूआर कोड स्कॅन करून ग्राहक आंबा उत्पादक शेतकऱ्याची माहिती जाणून घेऊ शकतील. आतापर्यंत एक कोटी स्टिकर्स तयार करण्यात आले असून देवगड तालुक्यातल्या ३०८ शेतकऱ्यांनी ५० लाखांहून अधिक स्टिकर...