January 18, 2026 7:18 PM

views 25

जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस दावोसला रवाना

स्वित्झर्लंडमध्ये उद्यापासून सुरु होत असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज दावोस इथं पोहोचले. उद्योग मंत्री उदय सामंत आणि प्रशासनातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या पथकात समावेश आहे. या परिषदेत, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि झारखंडचे मुख्यमंत्री जागतिक उद्योग गट, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी चर्चा करतील आणि आपल्या राज्यात थेट परकीय गुंतवणूक, औद्योगिक प्रकल्प, रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर भर...