August 16, 2024 3:20 PM August 16, 2024 3:20 PM
5
‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ विजेत्यांची घोषणा
विश्व संवाद केंद्राचे देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार यंदा अजित गोगटे, धीरज वाटेकर, प्रज्ञा पोवळे, अक्षय मांडवकर, ओंकार दाभाडकर, सचिन गायकवाड, गौरव ठाकूर आणि वनश्री राड्ये यांना दिले जाणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता मुंबईत किर्ती महाविद्यालयात पुरस्कार वितरण होईल, असं विश्व संवाद केंद्राने कळवलं आहे. सुधीर जोगळेकर, अश्विनी मयेकर, प्रसाद काथे, प्रणव भोंदे यांच्या निवड समितीनं विजेत्यांची निवड केली.