December 14, 2024 4:15 PM

views 23

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरुवात

‘दि ग्रेट शोमन’ या नावानं परिचित असलेल्या चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरुवात झाली. भारतीय चित्रपट विश्वाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाण्यात राज कपूर यांचा मोठा वाटा आहे. आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच सामाजिक आशयही वृद्धिंगत करण्यात त्यांच्या चित्रपटांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. केवळ भारतातच नव्हे तर विशषत्वाने रशियासह जगभरातल्या चित्रपट रसिकांनी राज कपूर यांच्या चित्रपटांना अखंड दाद दिली आहे. चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनासह अभिनेता या रू...