April 22, 2025 6:44 PM April 22, 2025 6:44 PM

views 50

साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हेंची कांबळे कुटुंबीयांना भेट

बीड इथं साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कांबळे कुटुंबाची भेट घेतली.   या भेटीनंतर गोऱ्हे यांनी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाचा आढावा घेत सूचना केल्या. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांबरोबर घेतलेल्य बैठकीत छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्याच्या सूचना गोऱ्हे यांनी दिल्या.   त्यानुसार आता बीडमध्ये प्रत्येक महाविद्यालयात बडी कॉप कार्यरत केले जाणार असून यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सहज तक्रार करता येणार आहे.