July 19, 2025 8:05 PM July 19, 2025 8:05 PM
22
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाचं उद्घाटन
ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाचं उद्घाटन आज ठाण्याच्या कोरस आरोग्य केंद्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. या अभियानाअंतर्गत पुढच्या ३ महिन्यात ५ लाख महिलांची वैद्यकीय तपासणी विनामूल्य करण्यात येणार आहे. विशेषतः गर्भाशयमुखाचा कर्करोग, मधुमेह, हिमोग्लोबिन या तपासण्या या अभियानात होणार असून ९ ते १४ वर्ष वयोगटातल्या मुलींसाठी एचपीव्ही लस उपलब्ध असेल. गर्भाशय मुख कर्करोगाच्या निदानासाठी आवश्यक साधनसामुग्रीकरता नगरविकास विभाग ठाणे महान...