November 16, 2024 6:24 PM November 16, 2024 6:24 PM
5
धारावी पुनर्विकास प्रकल्प सरकारी भागीदारीतून उभा राहत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन
मुंबईतली धारावी झोपडपट्टी अदानी उद्योगसमूहाला दिलेली नसून धारावी पुनर्विकास प्रकल्प सरकारी भागीदारीतून उभा राहत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोलीत देसाईगंज इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याप्रकल्पाची सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राजीव गांधी असताना त्यांनी धारावी पुनर्विकासाची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर 25 वर्ष काँग्रेसचं सरकार असतानाही धारावीचा विकास झाला नाही, अशी टीका त्यांनी केली. महायुतीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना पीक...