June 1, 2025 4:45 PM June 1, 2025 4:45 PM
10
डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती ठरेल असा विश्वास-अजित पवार
शेती म्हणजे संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे या भावनेनं एकत्र काम केलं तर राज्याची शेती डिजिटल युगात जगाला दिशादर्शक ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयांसह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यानं देशात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉनचं उदघाटन, अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कष्टाला कृषी तंत्रज्ञानाची जोड मिळावी तसंच न...