September 6, 2024 3:11 PM September 6, 2024 3:11 PM
6
ऑगस्ट महिन्यात देशभरात चाळीस लाखांहून अधिक नवीन डिमॅट खाती उघडली
नुकत्याच संपलेल्या ऑगस्ट महिन्यात देशभरात चाळीस लाखांहून अधिक नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली. यामुळे देशातल्या डिमॅट खात्यांची संख्या १७ कोटी १० लाखांवर पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्यात बाजारात विक्रमी संख्येनं आय पी ओ दाखल झाले आणि विविध कंपन्यांनी त्यांच्या माध्यमातून सुमारे १७ हजार कोटी रुपयांचं भांडवल उभारण्याचा मार्ग निवडला, त्यामुळे डिमॅट खात्यांमध्येही वाढ झाली, असं सेबीनं सांगितलं. निव्वळ आय पी ओ मध्ये सहभागी होण्यासाठी गुंतवणूकदार डिमॅट खाती उघडत आहेत, याशिवाय या वर्षात शेअर बाजार निर्देशांकां...