January 18, 2026 6:32 PM

views 1

दिल्ली पोलिसांच्या सायबर शाखेकड आंतरराज्यीय आर्थिक गुंतवणूक फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफार्श

दिल्ली पोलिसांच्या सायबर शाखेनं आंतरराज्यीय आर्थिक गुंतवणूक फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफार्श करून ८ जणांना अटक केली.  व्हॉट्स अप कॉल द्वारे बनावट गुंतवणूक योजनांमध्ये लोकांना आकर्षित करून त्यांच्याकडून पैसे उकळणं अशी त्यांची कार्य पद्धती असल्याचं अतिरिक्त पोलिस आयुक्त अभिमन्यु पोसवाल यांनी सांगितलं. या प्रकरणी कंबोडिया इथून सूत्र हलवली जात होती. त्यांच्याकडून १० मोबाइल फोन, १३ सीम कार्ड आणि विविध बँक खाती जप्त करण्यात आली.