December 21, 2025 3:19 PM December 21, 2025 3:19 PM

views 20

वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारची जीआरएपी ४ मोहीम तीव्र

दिल्ली सरकारने वायू प्रदूषण रोखण्यासाठी जीआरएपी ४ मोहीम तीव्र केली आहे.  प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या उद्योग आणि बांधकाम जागांवर कठोर कारवाईचा इशारा दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिरसा यांनी दिला आहे. नियमांचं उल्लंघन करणारे ६१२ उद्योग बंद करण्यात आले असून, तीन दिवसांत एक लाखाहून अधिक अधिक प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रे जारी करण्यात आल्याचं दिल्ली सरकारच्या पत्रकात म्हटलं आहे.

November 16, 2025 2:35 PM November 16, 2025 2:35 PM

views 15

लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या स्फोटाचे धागेदोरे मिळवण्याचं काम तपास यंत्रणेकडून सुरू

दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटाचे धागेदोरे मिळवण्याचं काम तपास यंत्रणा करत आहेत. देशभरातल्या विविध ठिकाणी अद्याप शोधमोहिमा, तपासण्या सुरू आहेत. दिल्ली गुन्हे शाखेनं आज अल फलाह विद्यापीठाविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रं तयार केल्याप्रकरणी दोन एफआयआर दाखल केले आहेत. दरम्यान, लाल किल्ला मेट्रो स्टेशन प्रवाशांसाठी पुन्हा खुलं झालं आहे.

October 19, 2025 9:47 AM October 19, 2025 9:47 AM

views 38

अयोध्येच्या धर्तीवर पहिल्यांदाच कर्तव्य पथावर दीपोत्सव साजरा

दिल्लीत काल अयोध्येच्या धर्तीवर पहिल्यांदाच कर्तव्य पथावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सव हा केवळ दिव्यांचा उत्सव नसून ती एक नवी पहाट असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या. श्रद्धा आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम दर्शवणारी एक नवकथा निर्माण होत असल्याचं त्या म्हणाल्या. यावेळी जवळपास दीड लाखांहून अधिक दिवे उजळण्यात आले तर हजारो ड्रोनच्या माध्यमातून रामायण कथा साकारण्यात आल्या. उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं आज शरयूतीरी दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. 26 लाख 11 हजार आणि 101 दिवे उज...

December 9, 2024 4:53 PM December 9, 2024 4:53 PM

views 10

दिल्लीच्या शंभू सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंबंधी नवी याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

दिल्लीच्या शंभू सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंबंधी नवी याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यासंबंधात न्यायालयात आधीच याचिका प्रलंबित असल्याने त्याच मुद्द्यावर नवी याचिका न्यायालय स्वीकारणार नाही असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने आज नमूद केलं आहे. आंदोलनासाठी महामार्गांवर अडथळे आणणे हा राष्ट्रीय महामार्ग कायद्यानुसार गुन्हा आहे आणि म्हणून न्यायालयाने आंदोलनकर्त्यांना हटवण्याचे आदेश द्यावेत यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती.

December 9, 2024 4:46 PM December 9, 2024 4:46 PM

views 79

देशातल्या आदिवासी भागांच्या विकासासाठी नाबार्डकडून निधी पुरवला जात असून गेल्या १८ वर्षांत १ हजार २९ प्रकल्प मंजूर

देशातल्या आदिवासी भागांच्या विकासासाठी नाबार्डकडून निधी पुरवला जात असून गेल्या १८ वर्षांत १ हजार २९ प्रकल्प मंजूर झाले असल्याचं आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं. आदिवासी विकास निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या या निधीतून आतापर्यंत ६ लाखांहून अधिक कुटुंबांना लाभ मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं.  

November 30, 2024 2:29 PM November 30, 2024 2:29 PM

views 20

राजधानी दिल्लीत काही भागांत हवा गुणवत्ता निर्देशांकाची पातळी ४०० अंकांवर

राजधानी दिल्लीत आजही हवेचा गुणवत्ता स्तर खूप खालावलेला आहे. सकाळी ७ वाजता हवा गुणवत्ता निर्देशांकांची सरासरी ३४८ इतकी नोंदवली गेली. शहराच्या काही भागांत हवा गुणवत्ता निर्देशांकाची पातळी ४०० अंकांवर गेली आहे. पुढचे दोन दिवस दिल्ली आणि एनसीआर भागात रात्री आणि पहाटेच्या वेळी धुरकं राहील, अशी शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.

November 17, 2024 11:03 AM November 17, 2024 11:03 AM

views 53

नवी दिल्लीतील राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील हवेची गुणवत्ता अजूनही गंभीर श्रेणीत

हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग आणि संबंधित अधिकार्‍यानी हवेची गुणवत्ता निकृष्ट असलेल्या नवी दिल्लीतील राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील विभागांसाठी श्रेणी निर्धारित कृती आराखडा तयार केला आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या बैठकीमध्ये यासंबंधी काही कडक निर्णय घेण्यात आले. येत्या आठवडाभरात नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचं निवारण तातडीनं करण्याच्या सूचना हवा गुणवत्ता आयोगानं संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित संस्थांकडून सर्व नियमांचं काटेकोरपणे प...

September 25, 2024 2:44 PM September 25, 2024 2:44 PM

views 23

दिल्लीत होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने काय पावलं उचलली याचा सर्वोच्च न्यायालयाने मागवला अहवाल

शेतात कृषी कचरा जाळल्याने राजधानी दिल्लीत होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने काय पावलं उचलली याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मागवला आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसी यांच्या पीठाने आज हे निर्देश दिले. दिल्लीच्या शेजारच्या राज्यांमधे कापणी नंतरचा कचरा शेतात जाळायला सुरुवात झाला असल्याचा उल्लेख न्यायमित्र अपराजिता सिंग यांनी आज केला. यासंदर्भात आयोगाने काय कारवाई केली असा सवाल न्यायालयाने केला. या संदर्भात दाखल जनहित याचिकेची सुनावणी येत्या शुक्रवार...

August 31, 2024 2:20 PM August 31, 2024 2:20 PM

views 15

दिल्लीतलं आप सरकार बरखास्त करण्याची भाजपाच्या आमदारांची मागणी

दिल्लीतलं आप सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपाच्या आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालचं सरकार निष्प्रभ आहे, असा आरोप करत दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजेंदर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना याबाबत निवेदन दिलं. दिल्ली प्रशासनाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे आणि त्यामुळे लोकहिताच्या कामांवर परिणाम होत आहे, असं या निवेदनात म्हटलं आहे.