October 28, 2024 10:34 AM

views 17

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता निकृष्ट श्रेणीत

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट श्रेणीत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री आठ वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक 347 इतका नोंदवला गेला. बुधवारपर्यंत हवेची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट श्रेणीतच राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे.