November 30, 2025 7:44 PM
38
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने हा एफआयआर नोंदला आहे. काँग्रेसचे अन्य नेते सुमन दुबे, सॅम पित्रोदा यांच्यासह एकूण ९ जणांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई खोडसाळ पणाची असून केवळ काँग्रेस नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी केली जात असल्याची टीका पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे.