March 31, 2025 6:31 PM

views 18

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक

दिल्ली एनसीआर भागात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. अंमली पदार्थ तस्करीविरोधी पथक आणि दिल्ली पोलिसांनी या टोळीला पकडलं असून या टोळीकडून २७ कोटी रुपयांहून जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या यशाबद्दल शहा यांनी कारवाई करणाऱ्या दलांचं कौतुक केलं आहे.

February 17, 2025 8:35 PM

views 25

नवी दिल्लीत भूकंपाचे झटके

राजधानी नवी दिल्लीत आज पहाटे पाच वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे झटके बसले. त्याची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीजवळ धौल कुवा इथं पाच किलोमीटर खोलीवर होता. यात जीवित अथवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही.    बिहारच्या सिवान आणि आसपासच्या जिल्ह्यातही आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले.  आज सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून भूकंप मापकावर त्याची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू सिवानपासून १० किलो मीटर अंतरावर अस...

November 22, 2024 3:06 PM

views 32

दिल्ली-एनसीआर परिसरात प्रदूषणाची पातळी ढासळली

दिल्ली-एनसीआर परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाची पातळी ढासळली आहे. आज सकाळी सात वाजता या परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३७१ म्हणजे अधिक खराब नोंदवला. तर काही ठिकाणी हा निर्देशांक ४०० पेक्षा अधिक होता. दिल्लीतील जहांगीरपुरी इथं ४२६, आनंद विहार इथं ४१०, रोहिणी इथं ३९७ आणि चांदणी चौकात ३५९ इतक्या निर्देशांकाची नोंद झाली.   पुढील दोन ते तीन दिवस दिल्ली-एनसीआरमध्ये रात्री आणि पहाटेच्या सुमारास धुके राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वायू गुणवत्तेत शून्य ते ५० हा स्तर चांगला...

November 21, 2024 3:08 PM

views 24

दिल्ली आणि एनसीआर परिसरातल्या हवेची गुणवत्ता अतिगंभीर श्रेणीत

दिल्ली आणि एनसीआर परिसरातल्या हवेची गुणवत्ता अतिगंभीर श्रेणीत अद्यापही कायम आहे. आज दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी वायु गुणवत्ता निर्देशांक ३७४ इतका नोंदवला गेला. तर शहरातल्या काही भागांनी ४००च्या पातळीचं उल्लंघन केल्याचं आढळलं आहे. यात वजीरपूर, जहांगीरपुरी, अशोक विहार, पंजाबी बाग, आनंद विहार अशा भागांचा समावेश आहे.