December 22, 2025 6:33 PM

views 9

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्धनॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्धच्या तक्रारीची दखल घ्यायला सत्र न्यायालयाने नकार दिल्यावर सक्तवसुली संचालनालयाने दिल्ली उच्चन्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने ईडीच्या तक्रारीवर त्या दोघांकडून जबाब मागितला आहे. याप्रकरणी मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत ईडीने तक्रार दाखल केली आहे.च्या तक्रारीची दखल घ्यायला सत्र न्यायालयाने नकार दिल्यावर सक...

May 31, 2025 6:34 PM

views 24

नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणातील खटल्याला स्थगिती देण्याची लालू यादव यांची याचिका फेटाळली

सी बी आय अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या घोटाळ्यात दाखल केलेल्या खटल्याला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. २००४ ते २००९ या कालावधीत रेल्वे मंत्री पदावर असताना यादव यांनी रेल्वेत नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवत त्याबदल्यात काहीजणांकडून जमिनीचे तुकडे आपल्या कुटुंबियांच्या तसंच नातेवाईकांच्या नावावर हस्तांतरित केल्याच्या आरोपावरून यादव यांच्याविरी...

March 21, 2025 8:01 PM

views 12

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची बदली आणि अंतर्गत चौकशी या 2 गोष्टी स्वतंत्र असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा प्रस्ताव आणि अंतर्गत चौकशी प्रक्रिया या दोन गोष्टी स्वतंत्र असल्याचं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयानं निवेदनाद्वारे दिलं आहे.    न्यायमूर्ती वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोख रक्कम सापडली होती. या प्रकरणाची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय यांनी अंतर्गत चौकशी सुरू केल्याचं आणि या चौकशीचा अहवाल आजच सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव ...

January 13, 2025 8:40 PM

views 15

दिल्ली सरकारच्या कथित अबकारी घोटाळ्याबाबत कॅगचा अहवाल

दिल्ली सरकारच्या कथित अबकारी घोटाळ्याबाबत कॅगचा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सादर करायला विलंब का झाला, यावरुन दिल्ली उच्च न्यायालयानं आज दिल्लीतल्या आप सरकारला धारेवर धरलं. याबाबत भाजपानं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी आज न्यायालयानं केली. त्याबरोबरच, दिल्ली विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी भाजपा आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवरही न्यायालयात सुनावणी झाली. निवडणुका जवळ आल्या असल्यानं विशेष अधिवेशन बोलावणं शक्य दिसत नसल्याचं न्यायालयानं सांगितलं. 

August 21, 2024 1:25 PM

views 16

पूजा खेडकरला २९ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्रातील निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर हिला येत्या २९ ऑगस्टपर्यंत अटक करण्यात येऊ नये, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पूजा खेडकर हिला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होईल, असा न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी यावेळी नमूद केलं.   दिल्ली उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीवेळी यूपीएससीनं सादर केलेला जबाब आपल्याला कालच मिळाला आहे. त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी पूजा खेडकर हिच्या ...

August 12, 2024 3:42 PM

views 13

पूजा खेडकर यांना २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

बडतर्फ प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. नागरी सेवा परीक्षा फसवणूक करून उत्तीर्ण झाल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या जामिन अर्जावर न्यायालयानं दिल्ली पोलिस आणि केंद्रीय लोकसवा आयोगाकडून उत्तर मागवलं आहे.

June 25, 2024 3:10 PM

views 16

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्तगिती

दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती दिली आहे. ईडीनं सादर केलेली कागदपत्र विशेष न्यायालयानं नीट पाहिली नाही, असं कारण उच्च न्यायालयानं जामीनाला स्थगिती देताना दिलं आहे.