July 31, 2024 2:47 PM July 31, 2024 2:47 PM

views 14

दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्या प्रकरणी अटक असलेल्या मंत्र्यांच्या कोठडीत ९ ऑगस्टपर्यंत वाढ

दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याशी संबंधित अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि भारत राष्ट्र समिती पक्षाच्या के. कविता यांची न्यायालयीन कोठडी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने येत्या ९ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. या तिघांची न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज न्यायालयात हजर करण्यात आलं.   या प्रकरणात सीबीआयने २९जुलै ला केजरीवाल यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. तर राऊस एव्हेन्यू कोर्टान...