December 15, 2024 8:30 PM

views 13

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आमआदमी पक्षाची चौथी यादी जाहीर

आम आदमी पक्षाने आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना कालकाजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.  आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाज यांना  ग्रेटर कैलाश मतदारसंघातून ,गोपाल राय यांना बाबरपूर मतदारसंघातून आणि इम्रान हुसेन यांना बल्लीमारन मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.