March 10, 2025 7:36 PM

views 27

खासदार शेख अब्दुल रशीद यांची पॅरोल याचिका दिल्लीतल्या एका न्यायालयानं फेटाळली

जम्मू आणि काश्मीरचे खासदार शेख अब्दुल रशीद यांची संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहण्याची परवानगी मागणारी पॅरोल याचिका दिल्लीतल्या एका न्यायालयाने आज फेटाळली. रशीद २०१९ पासून तिहार तुरुंगात असून २०१७ च्या दहशतवादी निधी प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्यांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत अटक केली होती.  

August 1, 2024 7:37 PM

views 22

पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन दिल्ली न्यायालयाने फेटाळला

नागरी सेवा परीक्षेच्या अर्जात खोटी माहिती दिल्याप्रकरणी माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन दिल्ली न्यायालयाने आज फेटाळला.   केंद्रीय लोकसेवा आयोगानं खेडकर यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय काल दिला. तसंच भविष्यात कोणतीही प्रशासकीय सेवा परीक्षा देण्यावर त्यांच्यावर बंदी घातली आहे.