March 26, 2025 8:11 PM March 26, 2025 8:11 PM

views 5

बँकविषयक कायदे सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी

बँकविषयक कायदे सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मंजूर झालं. बँक खात्यावर वारस म्हणून एकाऐवजी ४ नावं नोंदता यावी अशी तरतूद या विधेयकात आहे. बँकांच्या लेखा परीक्षकांचं मानधन ठरवण्याचा अधिकार बँकांना देणं, इत्यादी सुधारणा त्यात समाविष्ट आहेत. लोकसभेनं याआधीच हे विधेयक मंजूर केलं आहे.

March 25, 2025 3:00 PM March 25, 2025 3:00 PM

views 4

दिल्लीचा २०२५-२६ वर्षाचा एक लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

दिल्लीचा २०२५-२६ वर्षाचा एक लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री रेखा गुप्ता यांनी आज विधानसभेत सादर केला. भाजपाची सत्ता असलेल्या दिल्ली सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प प्रत्येक क्षेत्राच्या विकासावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करणारा असल्याचं अर्थमंत्री रेखा गुप्ता यांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर करताना म्हटलं. अर्थसंकल्पात २८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली खर्चाची तरतूद करण्यात आली आहे जी मागील अर्थसंकल्पापेक्षा जवळजवळ दुप्पट असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हट...