November 20, 2025 7:36 PM November 20, 2025 7:36 PM

views 24

दिल्ली स्फोट प्रकरणी आज चार जणांना अटक

दिल्ली स्फोट प्रकरणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने आज चार जणांना अटक केली. या आरोपींना श्रीनगर मधून ताब्यात घेतल्याचं एनआयएने सांगितलं. डॉक्टर मुझमील शकील गनई, डॉक्टर आदील अमहद राथर, मुफ्ती इरफान अहमद आणि डॉक्टर शाहीन सईद अशी आरोपींची नावं आहेत.   

November 14, 2025 9:15 AM November 14, 2025 9:15 AM

views 35

दिल्ली स्फोट प्रकरणी पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना जारी

दिल्लीत नुकत्यात झालेल्या कार स्फोट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी विमान प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू होण्याच्या निर्धारित वेळेच्या किमान तीन तास विमानतळावर पोहोचावं तसंच मेट्रो आणि रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी किमान 20 मिनिटे आधीच निर्धारित ठिकाणी पोहोचावं, अशा सुचना देण्यात आल्या आहे

November 13, 2025 1:37 PM November 13, 2025 1:37 PM

views 22

दिल्ली स्फोटातल्या हल्लेखोराची ओळख पटली

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवणारी व्यक्ती डॉ. उमर उन नबी असल्याचं डीएनए चाचणीतून स्पष्ट झालं आहे. स्फोटानंतर त्याचा पाय स्टीअरिंग व्हील आणि अ‍ॅक्सिलरेटरमध्ये अडकला होता. त्याचा डीएनए नमुना त्याच्या आईशी जुळला असल्याची माहिती, दिल्ली पोलिसांनी दिली.   दरम्यान, दिल्ली मेट्रोचं लाल किल्ला स्थानक सुरक्षेच्या कारणास्तव पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील असं मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कळवलं आहे. या तपासादरम्यान, अलफलाह विद्यापीठाच्या आवारातून आज आणखी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली. हे वाहन, संशयित...

November 13, 2025 9:11 AM November 13, 2025 9:11 AM

views 39

दिल्ली कारस्फोटातील जीवितहानीबद्दल मंत्रिमंडळाचा शोकप्रस्ताव

केंद्रीय मंत्रीमंडळाने दिल्लीत झालेल्या कारस्फोटातील जीवितहानीबद्धल तीव्र शोक व्यक्त करणारा ठराव काल मंजूर केला. मंत्रिमंडळाने दोन मिनिटांचे मौन पाळले. राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी सरकार कायमच वचनबद्ध असल्याचं आणि देशाच्या नागरिकांचं जीवन आणि कल्याण सुरक्षित करण्याच्या दृढ संकल्पाला मंत्रिमंडळाने पुन्हा एकदा मान्यता दिली.   केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं या भ्याड हल्ल्याचा...

November 12, 2025 7:58 PM November 12, 2025 7:58 PM

views 113

दिल्ली स्फोट प्रकरणी तपास यंत्रणांचे देशभरात छापे, मुंब्रा इथून एका संशयिताला अटक

दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं सुरू आहे. राष्ट्रीय तपास संस्था - एनआयए आणि सुरक्षा यंत्रणांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र तसंच जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा आणि कुलगामसह अनेक ठिकाणी मोठी कारवाई केली. या छाप्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली असून, श्रीनगरमधला डॉक्टर तजामुल मलिक याला ताब्यात घेण्यात आलं आहे. कुलगाममध्ये प्रतिबंधित संघटना जमात-ए-इस्लामी या संघटनेच्या ठिकाणांवर छापा टाकण्यात आला. या स्फोटात वापरण्यात आलेली कार गेल्या १० ते १२ दिवसांपासून फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाच्य...

November 12, 2025 1:40 PM November 12, 2025 1:40 PM

views 120

दिल्ली स्फोट प्रकरणी महाराष्ट्रातून एका संशयिताला अटक

दिल्ली स्फोट प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मुंब्रा इथून एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वस्तूंचा तपास केला जात असल्याचं एटीएसने सांगितलं.

November 11, 2025 7:51 PM November 11, 2025 7:51 PM

views 29

दिल्लीत बॉम्बस्फोट प्रकरणी उमर उन नबी चौकशीसाठी ताब्यात

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ काल संध्याकाळी झालेल्या स्फोटप्रकरणातले नवे धागेदोरे समोर आले आहेत. या स्फोटात वापरलेली गाडी डॉ. उमर मोहम्मद नबी चालवत असून तोच या घटनेतील संशयित असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं आहे.     संशयित आरोपी उमर हा जम्मू काश्मिरच्या पुलवामा इथला रहिवासी असून तो फरीदाबाद इथल्या अल फलाह विद्यापीठात शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

November 11, 2025 1:24 PM November 11, 2025 1:24 PM

views 50

दिल्लीत स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईचा प्रधानमंत्र्यांचा इशारा

दिल्लीत लाल किल्ला परिसरात स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. भूतान इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. काल रात्रीपासून स्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांकडून सातत्यानं माहिती घेत असून या स्फोटामागच्या खऱ्या सुत्रधाराला तपास यंत्रणा शोधून काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संपूर्ण देश स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचं मोदी यांनी सांगितलं. 

November 11, 2025 3:17 PM November 11, 2025 3:17 PM

views 31

दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक

लाल किल्ला इथल्या स्फोटानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृह सचिव,  गुप्तचर विभागाचे प्रमुख, दिल्ली पोलिस आयुक्त, राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक उपस्थित होते. जम्मू आणि काश्मिरचे पोलीस महासंचालक या बैठकीला दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते.   लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एका गाडीत काल संध्याकाळी सातच्या सुमारास एक शक्तीशाली स्फोट झाला. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल...