January 7, 2025 8:41 PM

views 19

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात ५ फेब्रुवारीला मतदान

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.  या निवडणुकीसाठी १० जानेवारीला अधिसूचना प्रसिद्ध होईल, १७ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १८ तारखेला अर्जांची छाननी होऊन, २० तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.    २३ फेब्रुवारीला मुदत संपणाऱ्या दिल्ली विधानसभेत ७० जागा आहेत. गेल्या निवडणुकीत त्यातल्या ६२ जागा आम आदमी पार्टीनं तर ८ ...

December 18, 2024 1:35 PM

views 10

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाची बैठक

पुढच्या वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठीची निवडणूक आयोगाची बैठक सध्या सुरू आहे. दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी, तसंच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी या बैठकीत चर्चा सुरू आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीही आयोग आज संवाद साधणार आहे. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ पुढच्या वर्षी २३ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षानं सर्व उमेदवारांची घोषणा केली आहे, तर काँग्रेसनं २१ जागांवरचे उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने अद्याप एकही उमेदवार दिलेला न...