February 9, 2025 9:49 AM February 9, 2025 9:49 AM

views 16

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दिल्ली विधानसभेत भाजपला 48 तर आम आदमी पक्षाला 22 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस सलग तिसऱ्यांदा 'शून्या' वर आल्याचं दिसून आलं आहे. भाजपला 27 वर्षांनी दिल्लीची सत्ता मिळाली आहे.   भाजपाचे परवेश वर्मा नवी दिल्लीतून, जंगपुरातून तरविंदर सिंग, करवाल नगरातून कपिल मिश्रा, राजौरी गार्डनमधून मनजिंदर सिंग सिरसा, गांधीनगरमधून अरविंदर सिंग लव्हली, ग्रेटर कैलाशमधून शिखा रॉय आणि मोती नगरातून हरिश खुराना विजयी झाले आहेत.   नवी दिल्ली...

February 3, 2025 8:58 PM February 3, 2025 8:58 PM

views 7

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची मुदत संपली

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार आज संपला. एकूण ७० विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान होऊन शनिवारी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी विविध ठिकाणी रोड शो केले.

February 2, 2025 3:04 PM February 2, 2025 3:04 PM

views 7

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात सुरु

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या संध्याकाळी संपणार आहे. भाजपा, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष रिंगणात असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोमाने प्रचार करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आरके पुरम इथं आज जाहीर सभा होणार आहे, तर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह राजेंद्र नगर, चांदणी चौक आणि लक्ष्मी नगर इथं सभा घेणार आहेत. काँग्रेस नेते अजय माकन आज दिल्लीत पत्रकार परिषद घेणार असून सत्ताधारी आम आदमी पक्षाचा प्रचारही जोमाने सुर...

January 28, 2025 8:12 PM January 28, 2025 8:12 PM

views 9

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचार सुरू

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्या राजकीय पक्षांकडून प्रचार जोरात सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि  भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज संध्याकाळी कस्तुरबा नगर मतदारसंघात रोड शो केला तसंच कालकाजी इथं  एका जाहीर सभेला संबोधित केलं.    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज संध्याकाळी पटपरगंज विधानसभा मतदारसंघात एका रॅलीला संबोधित केलं. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज मुंडका इथं तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी नरेला इथं  प्रचार केला. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष...