January 23, 2025 8:36 PM January 23, 2025 8:36 PM

views 8

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचारसभा

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचार सभा घेतली. किराडी मतदारसंघात जाहीर सभेत त्यांनी दिल्लीतले खराब रस्ते, अस्वच्छता या मुद्द्यावरून आम आदमी पार्टीवर टीका केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यावर केला. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा, उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याही प्रचारसभा झाल्या. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आज पक्...

January 22, 2025 2:16 PM January 22, 2025 2:16 PM

views 8

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी तसंच आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारसभा होणार आहेत. मोदी आज दूरदृष्यप्रणालीमार्फत बूथ पातळीवरच्या भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. भाजपाचे खासदार आमदारही या संवादात सहभागी होतील.

January 21, 2025 3:32 PM January 21, 2025 3:32 PM

views 14

दिल्ली निवडणुकांसाठी भाजपाच्या संकल्प पत्राचा दुसरा भाग जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्प पत्राचा दुसरा टप्पा भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीत प्रसार माध्यमांसमोर आज जाहीर केला. या संकल्पपत्रात दिल्लीतल्या तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी १५ हजार रुपयांची मदत, तसंच दोन वेळचा प्रवास आणि अर्ज शुल्काची परतफेड करण्याचं आश्वासन दिलं आहे. भाजपाचं सरकार आल्यास गरजू विद्यार्थाचं केजीपासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षण सरकारी शैक्षणिक संस्थांमार्फत मोफत दिलं जाईल, अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकण...

January 21, 2025 2:57 PM January 21, 2025 2:57 PM

views 15

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ६९९ उमेदवार रिंगणात

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांसाठी ६ हजार ९९ उमेदवार रिंगणात आहेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे २३ उमेदवार असून पटेल नगर आणि कस्तुरबा नगर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच प्रत्येकी पाच उमेदवार रिंगणात आहेत. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ हजार ५२२ अर्जांपैकी ४८७ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. पुढच्या महिन्याच्या ५ तारखेला मतदान होणार असून ८ तारखेला मतमोजणी होणार आहे.    दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्प पत्राचा दुसरा भाग भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी...

January 17, 2025 8:29 PM January 17, 2025 8:29 PM

views 7

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आजवर एक हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारपर्यंत आहे. ५ फेब्रुवारीला मतदान तर ८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.    उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज भाजपच्या शिखा राय आणि निरज बसोया तर आम आदमी पार्टीचे अवध ओझा, राखी बिदलान आणि बंदना कुमारी यांनीही आपले अर्ज दाखल केले. 

January 17, 2025 10:32 AM January 17, 2025 10:32 AM

views 11

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 68 जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीत, 70 जागांपैकी 68 जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार आहे. उर्वरित दोन जागांपैकी प्रत्येकी एक जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटकपक्ष असलेल्या संयुक्त जनता दल आणि राम विलास गटाच्या जनशक्ती पक्षाला देण्यात आल्या आहेत.   बुरारी विधानसभा मतदारसंघातून संयुक्त जनता दल आणि देओली विधानसभा मतदार संघातून जनाशक्ती पक्ष-रामविलास गटाचा उमेदवार निवडणूक लढवतील असं भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांनी काल प्रसार मध्यमांशी बोलताना सांगितलं.

January 17, 2025 10:24 AM January 17, 2025 10:24 AM

views 10

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत एकंदर 841 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.   सोमवारी 20 तारखेपर्यंत उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.

January 16, 2025 8:37 PM January 16, 2025 8:37 PM

views 8

दिल्ली विधानसभा : आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, गोपाल राय यांनी उमेदवारी अर्ज भरले

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, गोपाल राय यांनी उमेदवारी अर्ज भरले. भाजपाचे हरिष खुराणा, मनजिंदर सिंग सिरसा, आशिष सूद आणि कपिल मिश्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेस नेते संदीप दीक्षित, अरीबा खान यांनीही आज उमेदवारी अर्ज भरले. या उमेदवारांसाठी विविध नेत्यांनी रोड शोचे आयोजन केलं होतं.  दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने नऊ उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. काँग्रेसनही पाच उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फ...

January 16, 2025 2:18 PM January 16, 2025 2:18 PM

views 16

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. बवाना मतदारसंघातून सुरेंदर कुमार, करोल बागमधून राहुल धनक निवडणूक लढणार आहेत. सुरेश गुप्ता हे रोहिणी मतदारसंघातून, तुघलकाबाद इथून विरेंदर बिधुरी आणि बद्रापूर इथून अर्जुन भदाना निवडणूक लढणार आहेत. त्याआधी मंगळवारी काँग्रेसने सोळा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती. काँग्रेसने आतापर्यंत ६८ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

January 15, 2025 8:35 PM January 15, 2025 8:35 PM

views 7

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर, पोलिसांच्या उपाययोजना सुरु

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालं असून या निवडणुका शांततेत आणि विनादबाव पार पडाव्यात याकरिता दिल्ली पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. १२३ विनापरवाना हत्यारं, ९२ काडतुसं, १२ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले असून एक कोटी रुपयांहून अधिकच्या रोकडीचाही यात समावेश आहे. ७ जानेवारीला निवडणूक वेळापत्रक घोषित झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. सुरक्षेच्या कारणावरून सुमारे ७ हजार ४५४ लोकांना अटक करण्यात आली आहे.मद्य तस्करीवरदेखील पोलिसांनी विशेष का...