February 4, 2025 8:08 PM February 4, 2025 8:08 PM
27
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान होत आहे. सकाळी सात ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात असून १ कोटी ५६ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला असून, निवडणूक आयोगानं १ लाख ८० हजारापेक्षा जास्त कर्मचारी तैनात केले आहेत. गेल्या २४ तासांत पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत १४ जणांना अटक केली असून २५ जणांविरोधात FIR दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्...