March 24, 2025 8:04 PM March 24, 2025 8:04 PM
10
दिल्लीत आपच्या कार्यकाळाबद्दल श्वेतपत्रिका प्रकाशित करण्यात येईल
राजधानी दिल्लीत पूर्वी सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्ष सरकारच्या कार्यकाळाबद्दल श्वेतपत्रिका प्रकाशित करण्यात येईल अशी घोषणा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केली आहे. दिल्ली विधानसभेत आज दिल्ली परिवहन मंडळावरच्या महालेखापालांच्या अहवालाबद्दल चर्चा सुरु असताना त्यांनी ही घोषणा केली.