December 29, 2025 1:45 PM December 29, 2025 1:45 PM

views 10

उत्तर भारतात धुक्यामुळे विमानउड्डाणे, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

उत्तर भारतात धुक्यामुळे विमानउड्डाणे तसंच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्लीला येणाऱ्या अठरा रेल्वे गाड्या तीन तासांपेक्षा उशीराने धावत आहेत अशी माहिती रेल्वेच्या दिल्ली विभागानं दिली.  धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरुन नियोजित ६४ हवाई उड्डाणे रद्द झाली.  प्रवाशांनी विमान कंपन्यांच्या अधिकृत संपर्क यंत्रणेवरुन अद्ययावत माहिती घेऊन प्रवास करावा अशी सूचना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने केली आहे. 

August 17, 2024 2:46 PM August 17, 2024 2:46 PM

views 50

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटचे दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर आणि याविरोधात केलेली याचिका फेटाळण्यात आल्यानंतर आज सकाळी दिल्ली विमानतळावर उतरली. तिच्या चाहत्यांनी तिचं जोरदार स्वागत केलं. विनेशचे कुटुंबीयही यावेळी उपस्थित होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या सामन्याआधी विनेशचं वजन १०० ग्रॅम जास्त भरल्यानं तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं होतं. याविरोधात तिनं क्रीडा न्यायालयात दाद मागितली होती आणि संयुक्तरीत्या रौप्यपदक देण्याची मागणी केली होती. तिची, ही याचिका फेटाळ...