November 3, 2024 4:00 PM November 3, 2024 4:00 PM

views 14

दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेचा निर्देशांक अद्याप अतिशय वाईट

दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेचा निर्देशांक अद्याप अतिशय वाईट आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी १२ वाजता दिल्लीत हवेचा निर्देशांक ३७९ इतका नोंदवला गेला. पुढचे २ ते ३ दिवस दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात धुकं आणि धुराचा पातळ थर राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.