November 17, 2025 1:29 PM November 17, 2025 1:29 PM

views 6

दिल्ली कारस्फोट प्रकरणी आमीर राशीद याला १० दिवसांची एनआयए कोठडी

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आमीर राशीद अली, या कश्मिरच्या रहिवाशाला दिल्लीत अटक केली.   असून त्याला पटियाला हाऊस न्यायालयाने १० दिवसांची एनआयए कोठडी दिली आहे.  अमीर यानं, उमर नबी याच्यासोबतीनं स्फोटाचा कट रचला होता, असं तपास यंत्रणेनं म्हटलं आहे. या स्फोटात वापरलेल्या कारची नोंदणीही आमीर याच्या नावावर होती अशी माहिती तपास यंत्रणेनं दिली आहे.