August 31, 2024 8:26 PM August 31, 2024 8:26 PM
11
जपानच्या संरक्षण मंत्र्यांकडून २०२५ या आर्थिक वर्षासाठी ५९ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा प्रस्ताव
जपानच्या संरक्षण मंत्र्यांनी २०२५ या आर्थिक वर्षासाठी संरक्षण विभागासाठी सर्वाधिक निधीच्या तरतूदीचा प्रस्ताव ठेवला आहे. पुढील वर्षासाठी ५९ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून काल झालेल्या बैठकीत या तरतूदीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. येत्या डिसेंबर मध्ये अर्थ मंत्रालयाबरोबर होणाऱ्या बैठकीत यावर विचारविनिमय होईल. पुढील आर्थिक वर्षात जपानी संरक्षण सिद्धता अधिक मजबूत करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे.