October 25, 2025 6:38 PM October 25, 2025 6:38 PM
45
लष्करी अधिकाऱ्यांच्या कल्याणासाठीच्या विविध उपक्रमांचं उद्घाटन
लष्करी अधिकाऱ्यांच्या कल्याणासाठीच्या विविध उपक्रमांचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. राजस्थानात जैसलमीर इथं लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेत सुरु केलेल्या उपक्रमांमधे लष्करासाठी डिजिटल डेटा संकलनाचा समावेश आहे. लष्करी जवानांना देशभरात रेल्वेने प्रवास करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा सैनिक यात्री मित्र अपचं उद्घाटनही राजनाथ सिंग यानी केलं.