April 2, 2025 10:32 AM April 2, 2025 10:32 AM
2
देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या निर्यातीत 12टक्क्यांनी वाढ
गेल्या आर्थिक वर्षात देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या निर्यातीत 12 टक्क्यांनी वाढ होऊन ती विक्रमी 23 हजार 600 कोटी रुपायांहून जास्त झाली आहे. यात, संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपन्यांचा वाटा सुमारे 43 टक्के म्हणजे 8 हजार 3 शे 89 कोटी रुपये आहे. 2 हजार 29 सालापर्यंत, ही निर्यात 50 हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमध्यमांवरील संदेशात म्हंटलं आहे.