May 13, 2025 7:43 PM May 13, 2025 7:43 PM

views 9

संरक्षण क्षेत्रासाठी यंदा सहा लाख ८१ हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद

संरक्षण क्षेत्रासाठी सहा लाख ८१ हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केल्याचं सरकारनं सांगितलं आहे. २०१३-१४ मधे ही तरतूद दोन लाख ५३ हजार कोटी रुपये होती. धोरणात्मक सुधारणा, खासगी क्षेत्राचा सहभाग आणि नवोन्मेष यामुळे उत्पादनात वाढ झाली असून भारत हा संरक्षणविषयक सामुग्री निर्यात करणारा देश बनल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. यामुळे अर्थव्यवस्थेत भर पडल्याचंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

August 31, 2024 8:26 PM August 31, 2024 8:26 PM

views 11

जपानच्या संरक्षण मंत्र्यांकडून २०२५ या आर्थिक वर्षासाठी ५९ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा प्रस्ताव

जपानच्या संरक्षण मंत्र्यांनी २०२५ या आर्थिक वर्षासाठी संरक्षण विभागासाठी  सर्वाधिक निधीच्या  तरतूदीचा प्रस्ताव ठेवला आहे. पुढील वर्षासाठी ५९ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून काल झालेल्या बैठकीत या तरतूदीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. येत्या डिसेंबर मध्ये अर्थ मंत्रालयाबरोबर होणाऱ्या बैठकीत यावर विचारविनिमय होईल. पुढील आर्थिक वर्षात जपानी संरक्षण सिद्धता अधिक मजबूत करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे.