August 24, 2024 11:14 AM August 24, 2024 11:14 AM

views 24

भारत – अमेरिका दरम्यान महत्त्वाचा संरक्षण करार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.  संरक्षण मंत्र्यांच्या या भेटीत भारत आणि अमेरिकेत पुरवठा सुरक्षा व्यवस्था करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारातून परस्परांना संरक्षण सामग्री पुरवठ्यात प्राधान्य देण्याचं मान्य झालं.    अमेरिकेबरोबर असा करार करणारा भारत हा अठरावा देश आहे.  दोन्ही देशांमध्ये संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.  सध्या आणि भावी काळातल्या संरक्षण विषयक सहयोगासंदर्भात राजनाथ सिंह अमेरिकन संरक्षण उद्योगाबरोबर...

August 19, 2024 11:01 AM August 19, 2024 11:01 AM

views 12

चेन्नईतल्या भारतीय तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयातील प्रादेशिक सागरी प्रदूषण प्रतिसाद केंद्राचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल चेन्नईतल्या भारतीय तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयातील प्रादेशिक सागरी प्रदूषण प्रतिसाद केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. प्रादेशिक सागरी प्रतिसाद केंद्र तेल गळतीच्या प्रतिसादासाठी एकात्मिक दृष्टीकोन सुनिश्चित करून या भागातील देशांमध्ये समन्वय सुलभ करेल. यामुळे तेल गळतीला अधिक एकजुटीने प्रभावी प्रतिसाद देता येऊ शकेल तसंच त्यासाठीची खास उपकरणं आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध होण्यास मदत होण्यासोबतच त्यावर प्रत्येक देशाला वैयक्तिकरीत्या शक्य नसलेले नावीन...

August 18, 2024 1:21 PM August 18, 2024 1:21 PM

views 17

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चेन्नई इथं भारतीय तटरक्षक दलाच्या सागरी बचाव समन्वय केंद्राचं उद्घाटन करणार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज चेन्नई दौऱ्यावर जात आहेत. या भेटीदरम्यान भारतीय तटरक्षक दलाकडून चेन्नईत उभारण्यात आलेल्या नव्या अत्याधुनिक सागरी बचाव समन्वय केंद्राचं तसंच सागरी प्रदुषण प्रतिसाद केंद्र तसंच पुद्दुचरी इथं उभारण्यात आलेलं तटरक्षक दलाच्या एअर एन्क्लेव्हचं उद्घाटनही सिंह यांच्या होणार आहे. चेन्नईस्थित प्रदुषण केंद्र, सागरी प्रदुषण व्यवस्थापनातलं अग्रगण्य पाऊल आहे. या केंद्रामुळे सागरी प्रदुषणाच्या घटना विशेषतः किनारपट्टीलगतच्या राज्यांमध्ये होणाऱ्या तेल आणि रसायन गळतीच्या घटनांमध्ये प्...