November 21, 2024 8:01 PM November 21, 2024 8:01 PM

views 8

भारत – अमेरिका  संरक्षण भागीदारीमध्ये उभय देशांमध्ये वाढते सहकार्य, औद्योगिक संशोधन यामध्ये अधिकाधिक  प्रगती होत आहे- राजनाथ सिंह

भारत - अमेरिका  संरक्षण भागीदारीमध्ये उभय देशांमध्ये वाढते सहकार्य, माहितीची देवाणघेवाण आणि औद्योगिक संशोधन यामध्ये अधिकाधिक  प्रगती होत आहे, असा विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन  यांनी व्यक्त केला.  ते  आज  लाओस मधल्या व्हीएनटीएन इथं झालेल्या ११ व्या आशियन संरक्षणमंत्रांच्या  बैठकी दरम्यान बोलत होते.  या बैठकी दरम्यान राजनाथ सिंह यांनी न्यूझिलंडचे संरक्षण मंत्री ज्युडिथ कॉलिन्स ,दक्षिण कोरियाचे  संरक्षण मंत्री किम योंग ह्युन यांची तसंच ऑस्ट्रेलि...

November 19, 2024 8:19 PM November 19, 2024 8:19 PM

views 8

भारतीय वायुसेनेचं समर्पण आणि व्यावसायिकतेचं केंद्रीय संरक्षणमंत्र्यांकडून कौतुक

देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारतीय वायुसेनेचं समर्पण आणि व्यावसायिकतेचं कौतुक केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज केलं. नवी दिल्ली इथं आज भारतीय हवाई दलाच्या  तीन दिवसीय  द्विवार्षिक कमांडर्स परिषदे मध्ये ते  बोलत होते.  भविष्यातल्या आव्हानांशी जुळवून घेण्याच्या हवाई दलाच्या क्षमतेवर  त्यांनी विश्वास व्यक्त केला.  या परिषदेला हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग हे देखील  उपस्थित होते. 

November 18, 2024 8:15 PM November 18, 2024 8:15 PM

views 9

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान लाओस देशाच्या दौऱ्यावर जाणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान लाओस देशाच्या दौऱ्यावर जाणार असून तिथं ते आसियान संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. प्रादेशिक  आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यांवर ते परिषदेत मार्गदर्शन करतील. ते अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, लाओस, मलेशिया, न्यूझीलंड, फिलिपाइन्स आणि दक्षिण कोरिया या देशांच्या संरक्षणमंत्र्यांशीही ते परिषदेदरम्यान द्वीपक्षीय चर्चा करणार आहेत.  

November 3, 2024 11:35 AM November 3, 2024 11:35 AM

views 7

देशाची संरक्षण निर्यात 2029-30 पर्यंत 50 हजार  कोटी रुपयांपर्यंत जाईल-संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारताच्या आत्मनिर्भर मोहिमेचे अपेक्षित परिणाम होत असून देशाची संरक्षण निर्यात 2029-30 पर्यंत 50 हजार  कोटी रुपयांपर्यंत जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. कानपूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या 65 व्या स्थापना दिवस समारंभात ते काल बोलत होते. भारतीय तरुणांना 'विकसित भारत' हा दृष्टिकोन साकार करण्यासाठी देशात आयात होणाऱ्या उच्च तंत्रज्ञानाचा स्वदेशात विकास करण्याचं संरक्षणमंत्र्यांनी आवाहन केलं. आयआयटी कानपूरसारख्या संस्था शैक्षणिक इंजिनं असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात ...

October 29, 2024 8:07 PM October 29, 2024 8:07 PM

views 8

भारतीय नौदलाचा नवोन्मेष आणि स्वदेशीकरण परिसंवाद कार्यक्रम स्वावलंबन २०२४

संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाला चालना देऊन संरक्षण  सामुग्रीची आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न  असल्याचा पुनरुच्चार सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला. भारतीय नौदलाच्या नवोन्मेष आणि स्वदेशीकरण परिसंवाद, स्वावलंबन २०२४ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. संरक्षण क्षेत्रात खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांचं समसमान योगदान असायला हवं असं संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केलं. सशक्त संरक्षण औद्योगिक परिसंस्था उभारण्यासाठी सरकारने खासगी क्षेत्राला अनेक सवलती दिल्या आहेत, असंही राजनाथ सिंह यांनी सां...

October 24, 2024 7:58 PM October 24, 2024 7:58 PM

views 5

नियंत्रण रेषेजवळ लष्कराची गस्त आणि गुरांची चराई सुरु राहण्यात भारत आणि चीनचं एकमत

भारत आणि चीनमध्ये राजनैतिक आणि लष्करी पातळीवरच्या वाटाघाटी सुरु असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या काही भागाबद्दल असलेले मतभेद मिटवण्यात त्यांचा उपयोग होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज आयोजित झालेल्या ‘चाणक्य संवाद २०२४’ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. नियंत्रण रेषेजवळ लष्कराची गस्त आणि गुरांची चराई सुरु राहणं याबाबत दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं त्यांनी सांगितलं.    देशाच्या विकासात तंत्रज्ञानविषयक सुधारणांबरोबरच सुरक्षा राखण्याचं भारताचं उद्दिष्ट असू...

October 22, 2024 8:12 PM October 22, 2024 8:12 PM

views 10

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘६व्या भारत-सिंगापूर संरक्षण मंत्री संवादाचं’ सहअध्यक्षपद भूषवलं

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं सिंगापूरचे संरक्षण मंत्री  डॉ. एनजी इंग्ज हेन यांच्या बरोबर 'सहाव्या भारत-सिंगापूर संरक्षण मंत्री संवादाचं ' सह-अध्यक्षपद भूषवलं. दोन्ही देशांमधली सामायिक धोरणात्मक भागीदारी, परस्परांबरोबरच्या वाढत्या संबंधांचं द्योतक असल्याचं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं.    भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाचं हे दहावं वर्ष असून, सिंगापूरच्या दृष्टीनं भारत हा नेहमीच पूर्वेचा भाग असल्याचं डॉ. एनजी इंग्ज हेन यांनी यावेळी नमूद केलं. 

October 19, 2024 8:07 PM October 19, 2024 8:07 PM

views 7

सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपयुक्त परिसंस्था उपलब्ध केली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

बदलत्या जागतिक परिस्थितीत भारताच्या लष्कराला भविष्यवेधी  ठेवण्यासाठी सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपयुक्त परिसंस्था उपलब्ध करून दिली आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या बासष्टाव्या एम फिल दीक्षांत समारंभात बोलत होते. आताचं युद्ध पूर्वीसारखं केवळ जमीन, पाणी आणि आकाशापुरतंच मर्यादित राहिलं नसून सध्या अशी युद्धं माहिती अर्थात डेटा च्या जोरावर आणि सायबर जग तसंच अवकाशात देखील लढली जात आहेत, असं राजनाथ सिंह म्हणाले.  भविष्यात क...

September 12, 2024 1:25 PM September 12, 2024 1:25 PM

views 12

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताची वाटचाल वेगानं होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन

  संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताची वाटचाल वेगानं होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. भारतीय हवाई दलातर्फे राजस्थानात जोधपूर इथं आयोजित तरंग शक्ती विमान सरावाची पाहणी केल्यानंतर आज ते बोलत होते. या सरावाच्या निमित्तानं हवाई दलानं आयोजित केलेल्या भारतीय संरक्षण हवाई प्रदर्शन म्हणजे आयडॅक्स-२४ चं उद्घाटन  संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते झालं. आजपासून चौदा तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात विमानविषयक सामुग्री उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्यांचा मोठा ...

August 26, 2024 12:59 PM August 26, 2024 12:59 PM

views 23

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची अमेरिकेतल्या राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाला भेट

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल अमेरिकेतल्या राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाला भेट दिली आणि टेनेसी मधल्या मेम्फिस इथं भारतीय समुदायाशी संवाद साधला. राजनाथ सिंह यांचा अमेरिका दौऱ्याचा  काल शेवटचा दिवस होता. मेम्फिस, अटलांटा आणि नॅशव्हिल इथल्या भारतीय समुदायाबरोबर संवाद साधताना सिंग यांनी भारतीय समुदायाच्या समाज, विज्ञान आणि अर्थव्यवस्थेतल्या योगदानाचं कौतुक केलं. हे राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालय १७ व्या शतकातलं अमेरिकेच्या नागरी हक्क चळवळीचा इतिहास सांगणारं असून या ठिकाणी महात्मा गांधींचा ए...