May 13, 2025 1:26 PM May 13, 2025 1:26 PM
8
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत देशाच्या पश्चिम सीमेच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी तसंच संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग हे उपस्थित होते.