October 29, 2025 1:23 PM October 29, 2025 1:23 PM

views 33

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग १२व्या आसियान संरक्षणमंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होणार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग येत्या शनिवारी म्हणजे १ नोव्हेंबर रोजी मलेशियाच्या क्वालालंपूर इथं १२ व्या ए डी एम एम प्लस म्हणजेच आसियान संरक्षणमंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत  ते आसियान संरक्षणमंत्र्यांच्या परिषदेच्या १५ वर्षांच्या प्रवासाचं  प्रतिबिंब आणि पुढील वाटचाल’ या विषयावर विचार व्यक्त करतील. या दोन दिवसीय या दौऱ्यात राजनाथ सिंग सहभागी देशांच्या संरक्षणमंत्र्यांसोबत तसेच मलेशियाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत  द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत. २०२४ ते २०२७ या कालावधीत भारत आणि मलेश...

October 27, 2025 8:49 PM October 27, 2025 8:49 PM

views 42

भारताची संरक्षण निर्यात २३ हजार ५०० कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची संरक्षण मंत्र्यांची माहिती

भारताची संरक्षण निर्यात आता २३ हजार ५०० कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या एसआयडीएम वार्षिक परिषदेला ते आज संबोधित करत होते. गेल्या दशकात देशांतर्गत संरक्षण उत्पादन १ लाख ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढलं  आहे. नाविन्य, संरचना आणि उत्पादन अशा तिन्ही बाबींवर भर दिल्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं. स्वदेश निर्मित शस्त्रांस्त्रांमुळे भारताची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्याचंही सिंग यावेळी म्हणाले.

October 18, 2025 5:41 PM October 18, 2025 5:41 PM

views 56

लखनौ इथं संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं लोकार्पण

उत्तरप्रदेशातल्या लखनौ इथल्या ब्राह्मोस एअरोस्पेस युनिटमधे तयार  झालेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं लोकार्पण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत झालं. या युनिटमधे क्षेपणास्त्र निर्मिती ते चाचणीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया पार पडतात. ब्राह्मोस हे केवळ क्षेेपणास्त्र नाही तर भारताच्या वाढत्या स्वदेशी उत्पादन क्षमतेचं प्रतीक आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. ब्राह्मोसमधे अत्याधुनिक प्रणाली असून ते लांबपल्ल्यावर मारा करू शकतं. वे...

October 7, 2025 2:30 PM October 7, 2025 2:30 PM

views 21

संरक्षण क्षेत्रातली आत्मनिर्भरता कृतीमधे परावर्तीत झाली असून त्याचा व्यापक परिणाम झाला आहे-संरक्षणमंत्री

संरक्षण क्षेत्रातली आत्मनिर्भरता ही घोषणा आणि धोरणांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीमधे परावर्तीत झाली असून त्याचा व्यापक परिणाम झाला आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं संरक्षण नवोन्मेष संवाद कार्यक्रमात बोलत होते. आजच्या काळात युद्धामधे तंत्रज्ञानाचा वापर अधिक होत असून या बदललेल्या परिस्थितीची सरकारला जाणीव असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत सरकारने गेल्या दहा वर्षांत देशात संरक्षण उपकरणांच्या निर्मितीला प्रोत्साहन दिल्याच...

October 6, 2025 3:05 PM October 6, 2025 3:05 PM

views 54

संरक्षणमंत्री येत्या ९ ऑक्टोबरपासून दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येत्या ९ ऑक्टोबरपासून दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लस यांच्या निमंत्रणावरून हा दौरा होणार आहे. यावेळी संरक्षण मंत्री दोन्ही देशांतील आघाडीच्या उद्योजकांच्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. या भेटीमध्ये तीन करार होण्याची अपेक्षा असून, ज्यामुळे माहितीची देवाणघेवाण, सागरी क्षेत्र आणि संयुक्त उपक्रमाच्या क्षेत्रात सहकार्य वृद्धींगत होण्याची अपेक्षा असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. 

October 6, 2025 1:20 PM October 6, 2025 1:20 PM

views 45

नव्या संधी या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील नव्या संधी या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या नवी दिल्ली इथं करणार आहेत. संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालय आणि राज्यं तसंच केंद्रशासीत प्रदेश यांच्यात समन्वय साधणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. याप्रसंगी संरक्षण मंत्री एक्जिम पोर्टलचं उद्घाटन करतील. देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राच्या प्रगतीसाठी कोणती धोरणं आखायला हवीत यावर या परिषदेत विविध राज्यांच्या उद्योग विभागातील अधिकारी एकत्र चर्चा करतील.

September 30, 2025 1:06 PM September 30, 2025 1:06 PM

views 36

त्री-सेवा परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं संबोधन

एकविसाव्या शतकात सशस्त्र दलांमधली परस्परांबरोबर  समन्वय साधून काम करण्याची क्षमता आणि एकता, ही परिचालनात्मक गरज बनली आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं त्री-सेवा परिषदेत बोलत होते. सुरक्षेपुढले धोके गुंतागुंतीचे बनले आहेत, असं  ते यावेळी म्हणाले.    ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलानं प्रदर्शित केलेली हवाई संरक्षणामधली एकता उल्लेखनीय होती. या मोहिमे दरम्यान त्री-सेवांमधल्या समन्वयामुळे संरक्षण दलांना वेळेवर आणि अचूक निर्णय घेता आले,  असं ते म्हणाल...

September 22, 2025 1:13 PM September 22, 2025 1:13 PM

views 35

मोरोक्को इथं संरक्षण मंत्र्यांचा भारतीय समुदायाशी संवाद

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या मोरोक्को दौऱ्याच्या पहिल्या दिवशी रबात इथं भारतीय समुदायाशी संवाद साधला. या समुदायानं भारत आणि मोरोक्को या दोन्ही देशांच्या समृद्धीसाठी दिलेल्या योगदानाची त्यांची प्रशंसा केली. भारताच्या संरक्षण उद्योगानं दीड लाख कोटी रुपयांच्या उत्पादनाचा टप्पा  गाठला असून संरक्षण निर्यात २३ हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे, असं संरक्षण मंत्री म्हणाले.   भारत आता शंभराहून अधिक देशांना संरक्षण साहित्याची निर्यात करत आहे, असं त्यांनी सांगितलं. या संवादादरम्यान, ऑपरेशन...

August 9, 2025 2:42 PM August 9, 2025 2:42 PM

views 9

आर्थिक वर्ष २०२४-२५ मधे देशाचं संरक्षण उत्पादन एक लाख ५१ हजार कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर

आर्थिक वर्ष २०२४-२५ मधे देशाचं संरक्षण उत्पादन एक लाख ५१ हजार कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. संरक्षण औद्योगिक क्षेत्र बळकट होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही उत्पादनवाढ १८ टक्के जास्त आहे. यासाठी संरक्षणमंत्र्यांनी संरक्षण उत्पादन विभाग आणि इतर संबंधितांची प्रशंसा केली.

July 7, 2025 8:11 PM July 7, 2025 8:11 PM

views 12

ऑपरेशन सिंदूरमुळे स्वदेशी उत्पादनांची मागणी जागतिक स्तरावर वाढली-संरक्षण मंत्री

ऑपरेशन सिंदूर दरम्यान शौर्य आणि स्वदेशात निर्मित उपकरणांच्या क्षमतांचं प्रदर्शन यामुळे आपल्या स्वदेशी उत्पादनांची मागणी जागतिक स्तरावर वाढली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित संरक्षण लेखा विभागाच्या नियंत्रकांच्या परिषदेत बोलत होते. जग भारताच्या संरक्षण क्षेत्राकडे नव्या आदराने पाहत असल्याचं ते म्हणाले. आजवर आयात केली जाणारी बहुतांश संरक्षण उपकरणं आता स्वदेशात तयार केली जात आहेत, असं त्यांनी सांगितलं. संरक्षण क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनाचं श्रेय प...