June 27, 2025 4:12 PM June 27, 2025 4:12 PM
9
भारत आणि चीन दरम्यान पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारताचा कायम भर – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
भारत आणि चीन दरम्यान पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारतानं कायम भर दिल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. चीनचे संरक्षणमंत्री ॲडमिरल डोंग जुन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ते बोलत होते. चीनमध्ये सुरू असलेल्या संरक्षणमंत्र्यांच्या SCO च्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. २०२०मध्ये झालेल्या सीमावादानंतर ताणले गेलेले दोन्ही देशांमधील संबंध सर्वसामान्य व्हावेत, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त केलं. &...