October 21, 2024 8:58 AM October 21, 2024 8:58 AM

views 21

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या अनेक नेत्यांचं पक्षांतर

विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी रस्सीखेच सुरू असताना, पक्षबदलाचे वारेही जोरदार वाहात आहेत. माजी आमदार कपिल पाटील यांनी काल दिल्लीत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वाशिम जिल्ह्यातले वंचित बहुजन आघाडीचे माजी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी काल मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.   दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काल कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष...