October 21, 2024 2:41 PM

views 22

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारीला महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदक

मेक्सिको इथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या दीपिका कुमारी हिला आज महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत चीनच्या ली जियामन हिने सुवर्णपदक जिंकलं. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावण्याची दीपिकाची ही पाचवी वेळ आहे.